घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी काल पहिल्या श्रावण सोमवारी भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण वेरूळ नगरी दुमदुमून गेली.

पवित्र श्रावण महिन्यामध्ये ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग
श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीनंतर घृष्णेश्वराचे मुख्य पुजारी रवींद्र पुराणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी गाभाऱ्यामध्ये सोडण्यात आले. दर्शनासाठी रात्री लागलेल्या रांगा रात्रीपर्यंत कायम होत्या. 

हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण वेरूळ नगरी दुमदुमून गेली होती. संस्थानचे अध्यक्ष विकी दांडगे पुजारी, योगेश टोपरे, शशांक टोपरे, राजू कौशिके, मंगेश पैठणकर, सुमित बाबरेकर, संजय वैद्य यांच्यासह ग्रामस्थ भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.